Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सायकलचा स्टंट जिवावर बेतला, अंदाज चुकला अन् भिंतीला धडकला, जागेवरच जीव गेला, धक्कादायक घटना CCTV त कैद

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात स्टंट करण्याच्या नादात त्याला जीव गमवावा लागला आहे.

Tanvi Pol

Stunt Viral Video: सोशल मीडियावर मीडियावर दररोज अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायलल होत असतात. मग अनेकदा धोकादायक ठिकाणी स्टंटबाजी असो वा कधी प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट असो, तरुणाईमध्ये याचे प्रमाण वाढलेले आहे. अशाच सोशल मीडियावर एका तरुणाचा सायकलवर स्टंट करत असताना भिंतीवर आदळल्याने मृत्यू झालेला आहे. संपूर्ण घटना घटनास्थळावरील असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

नक्की काय घडले?

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रस्ता दिसून येत आहे. ज्या रस्त्यावरुन दोन तरुण चालत येताना दिसत आहे. त्या दोन तरुणांना सोडून रस्त्यावर जास्त नागरिकांची वर्दळ नाही. मात्र काही वेळात रस्त्याच्या एका बाजून एक तरुण येत आहे. मात्र तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की रस्ताचा मार्ग जरा उतार आहे. ज्या उतार असलेल्या रस्त्यावरुन एक तरुण सायकलवर स्टंट करण्याचा हिशोबाने येत असतो, मात्र वेगान सायकल आणि स्टंट करण्याच्या नादात तो तरुण एका जाऊन भिंतीला जाऊन जोरदार आधळतो आणि जमिनीवर पडतो. तरुणाच्या आवाजाने घरात आणि दुकानात असलेले नागरिक त्याच्याजवळ धाव घेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत (Video)दिसत आहे.

घटना नक्की कुठे घडली?

संपूर्ण धक्कादायक घटना भाईंदर येथील असून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा भिंतीवर डोकं आदळल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण काशीमीरा लगत असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर पर्यटणासाठी आलेला होता. मात्र किल्लावर फिरायला गेला असता तीव्र उताराच्या रस्त्यावर येताना सायकलवरून ताबा सुटला आणि समोरील इमारतीच्या गेटवर जाऊन धडकला .

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT