Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: हातात हात धरून शाळेत निघाल्या, भरधाव कारने विद्यार्थींनीना उडवले, १० फूट दूर फेकले, थरारक व्हिडिओ

Speeding car accident: नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

School Girls Hit By Car: उत्तराखंडमधील देहरादून येथे एक हृदयद्रावक रस्ता अपघात घडला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींनीच्या गटाला एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला असून, तो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या या घटनेत शाळेतील अनेक विद्यार्थींनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दिसत आहे. त्या रस्त्यावर शाळेतील विद्यार्थींची मोठी वर्दळ दिसत आहे. मात्र, त्याच वेळी रस्त्यावरुन एक वाहन अत्यंत वेगाने रस्त्यावर येत त्यांना चिरडले. घडलेल्या या घटनेनंतर अन्य विद्यार्थींनी घाबरलेल्या दिसत असून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत येतात. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दिवसेंदिवस देशभरात वाढणार ट्रॅफिक आणि भरधाव वाहनचालकांमुळे अशा अनेक अपघातांच्या घटना वाढत आहेत. विशेषत म्हणजे शाळांच्या वेळेत रस्त्यांवर कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना नसल्यानं लहान मुलं अपघातांना बळी पडत आहेत.

हा व्हिडिओ (Video) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. मात्र, त्यासोबत इन्स्टाग्रा आणि फेसबूक अन्य माध्यमांवर शेअर केला आहे. ही घटना पाहून प्रत्येक लोकांनी हैराण करणाऱ्या आणि कारचालकाविरुद्ध संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीप: हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT