Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...! गोव्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या एसी डब्ब्यात साप, प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडीओ पाहून दंग व्हाल

Shocking Viral Video: प्रवास करताना आपल्यापैंकी अनेकांना धक्कादायक अनुभव येत असतात. मात्र कधी तुम्हाला प्रवास करताना सापाशी सामना झालेला आहे का?

Tanvi Pol

Snake Viral Video: जगभरातील लाखोच्या संख्येने अनेक नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. गेल्या अनेक वर्षात रेल्वे प्रवासाही अनेक बदल घडून आले. मग रेल्वे मार्गाचे जाळे असो वा मग रेल्वेमधील सुविधा. मात्र सध्या एका व्हिडिओने रेल्वेमधून प्रवास करणे किती धोक्याचे बनले आहे ते दाखवून दिले आहे. मग प्रवास करताना तुमच्या सोबत लहान मुलं असल्यास हा प्रवास किती आरामदायी होईल की भितीदायक ते तुम्हाला सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून समजेल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन दिसत आहे. ज्यात ट्रेनमधला एक स्लिपिग कोच आहे. या कोचमध्ये पांढऱ्या रंगाची सादर आणि उभी आहे. मात्र व्हिडिओत नीट पाहिले तर दिसेल की याच चादरीच्यामध्ये एक साप आहे. सापाला पाहून त्या कोचमधील प्रवासी बाहेर जाऊन उभे आहेत. मात्र काही वेळात एक व्यक्ती येऊन त्या कोचमध्ये असलेल्या चादरीतील साप पकडून घेऊन जात आहे. व्हिडिओत शेवटला पाहिले तर ज्या व्यक्तीने हातात उचलून चादर पकडली आहे त्यात चक्क एक साप आहे. सर्व घटना (incident)रेल्वेमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@ankitkumar0168'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''21 ऑक्टोबर रोजी बर्थवर साप सापडला ही तक्रार माझ्या पालकांच्या वतीने आहे जे AC 2 टियर -(A2 31 , 33) मध्ये प्रवास करत आहेत. कृपया मी संदर्भासाठी व्हिडिओ संलग्न केले आहेत तत्काळ कारवाई करा'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेल आहे.

व्हिडिओ पाहून बऱ्याच यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही या व्हायरल व्हिडिओला पाहून दिलेल्या आहेत. त्यातील एक यूजर्संनी लिहिले आहे की,'' बापरे कसा पुढचा प्रवास करायचा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बाकी प्रवासीही खुप घाबरुन गेले असतील'' अशा अनेक प्रतिक्रिया अनेकांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT