Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खरा मुंबईकर! वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांनी काढला हटके मार्ग; VIDEO होतोय तूफान व्हायरल

Shocking Video: सध्या सोशल मीडियावर लोकल प्रवाशांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नक्की काय झाले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Mumbai Local Train: गेल्या काही वर्षापासून मुंबई लोकलचा प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी धावत लोकल पकडणे असो वा वेळेवर घरी जाण्यासाठी अनेकदा लोकलच्या दारात लटकून थांबणे, अशा अनेक कारणांमुळे काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल आहे, मात्र त्यातही वेळे वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्मवरुन उतरुन रेल्वेरुळ ओलांडून ट्रेन पकडण्यामुळे अनेकांनी जीव गमवावा लागला आहे, सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक लोकल प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही स्टेशनवरील प्लॅटफॉर्म पाहू शकता. व्हिडिओत पुढे लोकल ट्रेन येते आणि लोकल(Local Train) ट्रेनमधून एक प्रवाशी प्लॅटफॉर्म ओलांडताना दिसत आहेत मात्र ते लोखंडाची जाळी असलेल्या भागातून अर्थात प्रवेश नसलेल्या ठिकाणावरुन प्लॅटफॉर्म ओलांडत आहे. वेळ वाचवण्यासाठी सर्व प्रवाशांनी(Passenger) हा धोकादायक प्रयत्न केलेला आहे. मात्र यांचा व्हिडिओ रेल्वे स्टेशनवरील एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

लोकल प्रवाशांचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''borivali_churchgate_bhajan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेले आहे. व्हिडिओच्या प्रतिक्रियावरुन अनेक यूजरने हा व्हिडिओ दादर स्टेशनचा असल्याचे सांगितले आहे मात्र हा व्हिडिओ नक्की कुठल्या स्टेशनवरील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हिडिओ पाहिला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. पहिल्या यूजरने कमेट बॉक्समध्ये लिहिले आहे की,''लोक काय करतीस काही सांगता येत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कराव लागत भाई'' तर अनेकांनी संतापजणक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT