Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वेदनादायक! आजारी पत्नीसाठी वेळेआधीच निवृत्त झाला, फेअरवेल पार्टीत तिने जीव सोडला, मनाला चटका लावणारी घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र घडलेल्या या घटनेत नक्की काय घडले आणि कोणासोबत घडले ते एकदा व्हायरल व्हिडिओत नेटकऱ्यांनी पहा.

Tanvi Pol

Rajasthan News: सोशल मीडियावर सध्या राजस्थानमधील एक हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत आपल्या आजारी असलेल्या पत्नीसाठी घेतलेल्या रिटायरमेंट कार्यक्रमातच त्याच्या पत्नीचा हृदयविकारच्या झटकाने मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेत महिलेचा कोसळलेल्या जागीच मृत्यू झाला असून व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजणांना धक्का बसत आहे.

सोशल मीडियावर यापूर्वीही असे अनेक धक्कादायक(Shocking) व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. ज्यात अनेकांनी चालता फिरता जीव गमवावा लागला आहे, त्यात काही व्यक्तींचा लग्नात डान्स करताना तर काहींचा व्यायाम , जेवणाता अन् काहींचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यात सध्या या राजस्थानच्या कोट्यातील घडलेल्या घटनेची भर पडलेली आहे असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नेमके कसे घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक ऑफिस दिसत आहे. जिथे अनेक कर्मचारी फेअरवेल पार्टी निमित्ताने जमलेले दिसत असून तिथे मयत महिला आणि त्यांचे पती आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस ऑफिसमधील एक कर्मचारी त्या व्यक्तीचा आणि त्यासोबत त्या महिलेचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना दिसत आहे.

काही वेळ कोणत्याची अडचणी शिवाय कार्यक्रम सुरु असतो मात्र काही वेळात त्या महिलेला त्रास जाणवण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे त्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसतात, त्यांना पाहून तेथील सर्वजण म्हणतात त्यांना चक्कर आली मात्र काही क्षणाच्या अवधीत त्या संपूर्ण जमिनीवर कोसळताना दिसून येतात. संपूर्ण हृदयद्रावक घटना मोबाईलमध्ये कैद झालेली आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ''@SantoshGaharwar'' या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण सांगितले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दु:खत प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT