Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भाऊ आऊट ऑफ कंट्रोल! पुण्यातील चौकात तरुणाने सुरू केल्या पुश-अप्स

Drunk Man Video: सोशल मीडियावर सध्या एक विचित्र असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने डोक्याला हात मारल आहे. असे नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Pune Road incident: अनेकदा रस्त्यावरुन जाताना एखाद्या व्यक्तीची विचित्र वर्तणूक पाहून आपण थबकतो. बऱ्याचदा हसू येतं, तर कधी धक्का बसतो. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला असून एका व्यक्तीने भर रस्त्यात जे केलं त्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. ज्यात दारुच्या नशेत मध्यधुंद असलेल्या व्यक्तीने कोणताही विचार न करता थेट भररस्त्यात पुश-अप्स सुरु केले.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध जाताना दिसत असून तिथे तो अचानक पुश-अप्स मारण्यास सुरुवात करतो आणि हा व्यक्ती पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर वेगाने येणारे वाहने यांची भिती न बाळगता तो व्यक्ती त्याच्या नादात होता. अनेक लोक त्या व्यक्तीचा प्रकार लांबून पाहताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला आता हा व्हिडिओ पुण्यातला (Pune) असल्याचं म्हटलं जातंय. यात एक व्यक्ती दारूच्या नशेत भर रस्त्यात पुश - अप मारताना दिसतोय. एका सोशल मिडिया युजरने हा व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ पुण्यातील स्वारगेट परिसरातील असल्याचं सांगितलं आहे. दारूच्या नशेत या तरुणाने थेट एका हाताने भर चौकात पुश - अप मारायला सुरुवात केली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी याचा व्हिडिओ केला आणि मग काय सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसतोय

हा व्हिडिओ फेसबूक आणि अन्य सोशल माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला असून सध्या इन्स्टाच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांच व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळवून दिलेले आहे. शिवाय नेटकऱ्यांकडून अनेक मजेशीर प्रतिक्रियाही आलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT