Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावर धावत्या बर्निंग कारचा थरार! नागरिकांची तारांबळ, चालकाचा उडाला थरकाप; पाहा व्हिडिओ

Viral Video: सोशल मीडियावर सध्या जयपूरमधील एका कारच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यात कारला भयानाक आग लागलेली आहे.

Tanvi Pol

Burning Car Jaipur: सोशल मीडियावर आपल्याला कायम जगभरातील घटना क्षणार्धात समजतात. मग कधी या घटनांमध्ये लोकांच्या मृत्यूपासून ते थरारक अपघातांच्या घटना घडलेल्या असतात. मात्र काही धक्कादायक घटना अशा असतात की व्यक्तींच्या अंगाचा थरकाप उडवून त्यांना गोंधळात टाकतात. सध्या असात काहीशी घटना जयपूरमध्ये घडलेली आहे. जिथे भररस्त्यात धावत्या कारमध्ये आग लागली आहे. मात्र कारमध्ये कोणताही चालक नसून सुद्धा कार वेगात संपूर्ण रस्त्यावरुन पळताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओत एक वाहतुकीच्या ब्रिज दिसून येत आहे. या ब्रिजवर तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की एक कार धावत येत आहे. मात्र या संपूर्ण कारला आग लागलेली आहे. या संपूर्ण ब्रिजवर अनेक वाहन चालक आहे. जे आग लागलेली धावती कार पाहून पळत सुटलेले आहे तर काहीजण आपले वाहन घेऊन पळताना दिसत आहे.

व्हिडिओत अजून दिसेल की आग लागलेल्या कारमध्ये कोणीही चालक नाही कार अत्यंत वेगान ब्रिजवरुन धावत आहे. अनेकजण कार थांबवण्यासाठी तिच्यापाठी पळत आहे. कारमधून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसत आहे. मात्र या कारमधील चालक कुठे होता किंवा गाडीतच नाही ना हे अद्याप समजू शकलेले नाही शिवाय कारला आग कशामुळे लागली तेही समजू शकलेले नाही. संपूर्ण व्हिडिओ(Video) दुसऱ्या ब्रिजवरुन एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

कारचा थरार 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील '@iamnarendranath' या पेजवर १२ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''जयपूरमध्ये कारला आग लागली. देवाचे आभार कोणाला काही झाले नाही'' असे लिहिण्यात आलेले आहे. दिलेल्या कॅप्शनवरुन समजते की व्हिडिओ जयपूरमधील आहे.

जयपूरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून आतापर्यंत २ लाखाहून अधिकचे व्हिडिओला व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ'' तर अनेकांनीही अशाच प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT