Shocking Viral Video सौजन्य - एबीपी न्यूज
व्हायरल न्यूज

Bihar News: उत्सवावर विरजन, १० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: बिहार राज्यातून एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यात बोट उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

Tanvi Pol

Bihar News: सोशल मीडियावर बिहार राज्यातील एका घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत बिहार राज्यातील छपरामध्ये आयोजित केलेल्या छठ उत्सवादरम्यान बोट उलटल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेत १० पैंकी २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. सध्या या सर्व धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका नदीतून एक बोट येताना दिसत आहे. ज्या बोटीमध्ये अनेक व्यक्ती दिसून येत आहेत. व्हिडिओत पाहिले तर किनाऱ्यावर सर्वजण परत येताना दिसत आहेत मात्र किनाऱ्याजवळ येण्याआधी बोटीमधील सर्वजण पाण्यात पडतात कारण बोटीमध्ये व्यक्ती क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने सर्वजण पडतात. ज्या क्षणी बोटमध्ये असलेले सर्वजण पाण्यात पडतात तात्काळ किनाऱ्याजवळ असलेला एक तरुण पाण्यात सर्वांना वाचवण्यासाठी धाव घेताना व्हिडिओत दिसत आहे. सर्व घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार सर्व घटना बिहारमधील आहे. मात्र सर्व हा प्रसंग छठ पुजेदरम्यान घडलेला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेत तब्बल १० जण होती मात्र २ तरुणांना जीव गमवावा लागला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@abpnewstv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय कॅप्शनमध्ये,''बिहारमधील छठ उत्सवादरम्यान शुक्रवारी छपरा भागातील तरैय्या पोलीस ठाण्याच्या पाचभिंडा येथे बोट उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बोटीवर एकूण 10 मुले होती''असे लिहिण्यात आलेले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. एवढेच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे खुप भितीदायक होत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' त्यातील एकजण आपला फोन फेकत आहे'' तर अनेक भावनिक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SA 1st T20I: पहिला टी-२० सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra News Live Updates: मिरारोड मध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

SCROLL FOR NEXT