Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: 'ती’ एक चूक दोघांच्या जीवावर बेतली! धरणाच्या पाण्यात बोट घेऊन उतरण्याच्या नादात घडलं भयंकर; दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र नेमके काय घडले ते तुम्ही व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे दोन तरुणांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली आहे. या घटनेत धरणात गेलेल्या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धरणाच्या पाण्यात बोट घेऊन उतरण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे हा अपघात घडला. घडलेली संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल (Viral)होत असलेल्या घटनेतील तरूण पुण्यात भुसावळहून नोकरीसाठी आले होते मात्र मयूर आणि तुषार काही मित्रांसोबत पवना धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते. धरणातील पाण्याच्या(Water) खोलीचा अंदाज न घेता त्यांनी एक बोट घेतली आणि पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही जीवरक्षक जॅकेट घातले नव्हते. बोट पलटल्याने एक जण पाण्यात पडला, तर दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात दोघेही पाण्यात बुडाले. मयूर भारसाके, तुषार अहिरे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

ही घटना त्यांच्या इतर मित्रांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. सुरुवातीला इतर मित्रांना हे नाटक वाटले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला उशीर झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, आणि वन्यजीव रक्षक मावळच्या पथकाने शोधमोहीम हाती घेऊन दोघांचेही मृतदेह शोधून काढण्यात आले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ 'SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वी अशा अनेक भयानक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT