Viral Video: Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घोड्यानं लाथ मारली अन् होत्याचं नव्हतं झालं! वरातीत चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; घटनेचा VIDEO व्हायरल

Uttar Pradesh Video: सोशल मीडियावर सध्या कानपुरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात लग्नाची मिरवणुक एका दु:खत क्षणात बदलेली आहे.नक्की काय घडले ते एकदा तुम्ही पहाच.

Tanvi Pol

Kanpur Shocking Video: भारतातील लग्न म्हणजे अनेक परंपरा आणि विधी पाहण्यासाठी मिळत असतात.लग्न समारंभात लहान असो वा थाटामाटात साजरा केलेला असो,त्यात अनेक किस्से घडत असतात जे आयुष्याभर व्यक्तीच्या लक्षात राहतात.त्यातच कानपुरमध्ये लग्नाची जंगी वरात सुरु असताना एक भयंकर घटना घडली आहे.सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लग्नकार्यात आपल्याला विविध विधी पाहण्यासाठी मिळत असतात.मात्र सर्व लग्नात एक परंपरा पाहण्यासाठी मिळते ते म्हणजे लग्नात(Weeding) नवरदेवाची घोड्यावर मिरवणुक काढली जाते.नवरदेव ही घोड्यावरुन मिरवणुक काढण्यासाठी मोठ्या उत्साहात असतो.सध्या व्हायरल होत असलेली घटनाही मिरवणूकीतील आहे.ज्यात कानपुरमध्ये लग्नकार्याच्या वेळी घोड्याने चुकून लाथ मारल्याने एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सर्वत्र लग्नाच्या मिरवणुकीसाठी जमलेले लोक दिसत आहे. रस्त्यावर एक घोडा आहे जो मिरवणुकीसाठी आणलेल्या बॅंडच्या संगीतावर नाचत आहे.त्या दरम्यान घोडा नाचत असताना त्याच्या पाठीमागे काही चिमुकली खेळत खेळत येत असतात.त्या दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या घोड्याने त्यातील एका चिमुकल्याला जोरदार लाथ मारतो आणि तो चिमुकला जमिनीवर जोरदार कोसळतो.सर्व धक्कादायक घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल घटना कानपुरमधील असल्याचे समजत असून सर्व व्हिडिओ(Video) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ पाहणारा यूजर भावूक झालेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही त्याने केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''खूप भयानक घटना आहे'' तर काहींनी चिमुकल्यांच्या पालकांचे लक्ष कुठे होते या संबंधित संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: लग्नातील मिरवणूकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Marathi bhasha Vijay Live Updates : सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र ही मोठी गोष्ट, तेजस्विनी पंडीतचं विधान

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT