Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बर्फात कारवरील नियंत्रण सुटले, चालकाने उडी घेत वाचवला जीव, अटल टनलवरील थरारक व्हिडीओ व्हायरल

Shocking News: सोशल मीडियावर सध्या हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात एका कारचा थरार सुरु आहे. नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश थंडीने गारठून निघालेला आहे. माणसांपासून ते प्राणी थंडीपासून बचाव करत आहे. अशाच सर्वात जास्त थंड मानणाऱ्या हिमाचल प्रदेशमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिथे झालेल्या बर्फवृष्टीमुळे एका वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ते वाहन चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन भररस्त्यात बेकाबू झाले. सध्या सर्वत्र या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला अटल टॅनल जवळील संपूर्ण परिसर दिसत आहे. व्हिडिओत नीट पाहिले तर मोठ्या प्रमाणात बर्फ पडत आहे, अशातच या सर्वत्र पसरलेल्या बर्फावरून एक कार जात असते,मात्र बर्फावरुन कार घसरते आणि त्यातच चालकाच्या प्रयत्नाबाहेर कार जावून ती एका जागी गोल-गोल फिरताना दिसते. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की त्या कारमधून कार चालक जीव वाचवण्यासाठी उडी मारतो मात्र कार उलट्या दिशेने होऊन रस्त्याच्या उलट्या दिशेने वेगात जात असते. संपूर्ण धक्कादायक प्रकार तेथिल एका पर्यटकाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''abpnewstv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एबीपीन्यूजटीव्हीनुसार, व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये,'' अटल बोगद्याजवळील एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बर्फवृष्टीदरम्यान एक कार नियंत्रणाबाहेर पडताना दिसत आहे'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या घटनेवर अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''तुम्ही कसे ड्रायव्हर व्हाल?'' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की,''खाली असलेल्यांना मारायला भाऊ निघाला'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''हे खूप भयानक आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT