Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! कारने महिलेला धडक दिली अन् स्कूटीला तब्बल १ किमी नेले फरफटत;VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: कार चालकानं स्कुटरला धडक देत एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Drunk And Drive Odisha

ओडिसामधून एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. कार चालकानं स्कुटरला धडक देत एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आहे. या अपघातात दोनजण जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सध्या प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर ओडिसामधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका रस्त्यावर आपल्याला एक काळ्या रंगाची भरधाव वेगात धावणारी कार दिसते. या कारने एका दुचाकीला फरपटत नेत आहे त्यामुळे वेगात जाणाऱ्या कारच्या चाकामधून ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत. यादरम्यान रस्त्यावर आपल्याला वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. संबंधित कार चालकाचा व्हिडिओ रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं वेगानं कार पुढे नेली

मिळालेल्या माहितीनुसार, संपू्र्ण घटना (ता.३१)बुधवार रोजी भुवनेश्वरच्या स्मार्ट सीटीतील पाटिया-नंदनकनन रोडवर ही घटना घडली आहे. यात स्कुटर चालवणाऱ्या महिलेला धडक देत स्कुटरला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले असून यात ती जखमी झाली आहे .जखमी झाल्यानंतर तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भेभान झालेल्या कारचालकाने अजून एका व्यक्तीला धडक दिली होती आणि त्यालाही रुग्णालयात दाखल केले आहे.

कार चालक दारूच्या नशेत असल्यामुळे धक्कदायक घटना घडली असून तो पाटिया भागातील रहिवासी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कार जप्त केली असून आरोपी कार चालकाला अटक करण्यात आली आहे तसेच याबाबत त्याची अधिकची चौकशी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT