Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: फेमस होण्याच्या नादात भयंकर घडलं! घराच्या छतावर रील्स करताना महिलेचा पायच घसरला; VIDEO VIRAL

Shocking Incident Video: सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर रील्स करणं किती धोकादायक ठरु शकते.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Roof Stunt Gone Wrong: सोशल मीडियाच्या क्रेझमुळे बरेचजण रील्स बनवण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालतात. सध्या असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिलेसोबत भयानक अपघात झालाय. ती महिला घराच्या छतावर चढून रील्स बनवत होती. मात्र, अचानत महिलेचा तोल जातो आणि ती जोरदार खाली कोसळते. आता या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिला इंस्टाग्रामसाठी रील्स(Reels) बनवत होती. तिला सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचे होते, त्यामुळेच ती घराच्या छतावर चढून शूट करत होती. मात्र, महिला खाली उतरण्यासाठी जाताना दिसते, त्यातच अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट खाली पडली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ पाहून नेटकरी हादरले आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही जणांनी अशा धोकादायक स्टंटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, तर काही नेटकऱ्यांनी महिलेसोबत झालेल्या दुर्घटनेबद्दल सहानुभूती दर्शवली आहे.

हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील ''lalankanchan3'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिताच अनेक यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: महिलेचा हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT