Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेयसीला भेटण्यासाठी पठ्ठ्याने केला 'शोले स्टाइल' स्टंट; थेट दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढला अन्...

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका प्रियकराचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रेयसीला भेटण्यासाठी तो चक्क टॉवरवर चढला आहे. व्हिडिओत पुढे काय घडते ते एकदा पहा.

Tanvi Pol

Viral Video: अनेक लोक प्रेमात काय करतील याचा कधीच नेम नसतो. बरेचजण आपल्या प्रेमासाठी घरच्यांचा नकार झुगारुन आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते करतात,तर काही अनेक मैलाचा प्रवास करुन घेतात. सध्या अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे, ज्यात एका तरुण चक्क आपल्या प्रेमासाठी टॉवरवर चढला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशमधील ग्वालियर मधील आहे.

नेमके प्रकरण तरी काय?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा ग्वालियरमधील असल्याचे समजते. तिथे आपल्या प्रेयसीला भेटण्याची मागणी करत एक तरुण मद्यपान करुन चक्क लाईटच्या टॉवरवर चढला आहे. ज्यात दिसते की एक तरुण अतिशय उंचावर थांबलेला आहे आणि त्याला खाली उतरवण्यासाठी एक व्यक्ती टॉवरवर चढताना दिसत आहे. एवढेच नाही तर खाली जमलेले काही नागरिकांची आरडा-ओरड सुर आहे तर काही व्यक्ती सर्व थरारक(Shocking) प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

ग्लालियरमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, तो व्हिडिओ इन्स्टावरील ''ndtvmpcg'' या अकाउंटवर ११ तासापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वी ही अशा पठ्ठ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

तरुणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''या कारणामुळे प्रेम अजून जिंवत आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''येईल एक दिवस अंगाशी'' अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : तरुणाचा स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT