Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: याssssक्...रस्त्यावर भाजीपाला खरेदी करताय, थोडं थांबा; हा VIDEO पाहून प्रचंड राग येईलच, पण चिंताही वाढेल!

Viral Video: सोशल मीडियावर एक भाजी विक्रेत्यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्या व्हायरल व्हिडिओ तुम्ही विकत घेत असलेल्या भाज्या कशा प्रकारे स्वच्छ केल्या जातात ते दाखवले आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: गुरुवारी रात्री मुंबईसह मुंबई उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. सर्वत्र विजाच्या कडकडासह पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी रहिवासी भागात विजा पडल्या होत्या, सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओ मुसळधार पडणाऱ्या पावसात रस्त्यावरील भाजी विक्रेते पालेभाज्या धुताना दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. शिवाय व्हिडिओत तुम्हाला एक रस्त्यावर काहीजण भाज्या विकताना दिसत आहे. मुसळधार पाऊस पडत असतानाही अनेकजण भाजी विकत आहे. अशातच एक महिला व्हिडिओत दिसत आहे. जी रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसून येत आहे. सर्व धक्कादायक(Shocking) प्रकार तेथिल एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

भाजी विक्रेत्यांचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे शिवाय तो '@the_burgman_diaries' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू विश्वसनीय स्त्रोतांकडून खरेदी केल्याची खात्री करा. कमी किमतींपेक्षा सुरक्षितता आणि गुणवत्तेला प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, तुम्ही जे निवडता त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणावर होतो. सतर्क राहा आणि हुशारीने खरेदी करा'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठल्या शहरातील आहे हे समजले नाही.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला असून त्यावर नेटकऱ्यांनी लाखोंच्या घरात लाईक्स केलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' देवा हे काय'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कारवाई झाली पाहिजे'' तर अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT