Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कहरच झाला! आता आईस्क्रिमनंतर वेफर्समध्ये निघाला बेडूक; किळसवाणा व्हिडिओ पाहून खाण्याची इच्छा उडेल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो व्हिडिओ पाहून तुमचा संताप नक्की होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात आजही एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एका व्यक्तीने एका दुकानातून वेपर्सचा पुढा खरेदी केला असता त्यामधून चक्क मेलेला बेंढूक आढळून आलेला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.

सोशल मीडिया हे माध्यम लोकांपर्यत पोहचण्याचे सर्वांत वेगवान माध्यम ठरते. कोणतीही घटना घडताच क्षणार्धात ती सर्वांपर्यंत पोहचते. त्यात सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थांमध्ये किडे आढळणारे व्हिडिओ समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आयस्क्रिममध्ये चक्क एका व्यक्तीचे बोट आढळून आले होते. त्याआधी दिल्लीमधून (delhi) छोलेमध्ये मेलेली पाल आढळून आली होती.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा गुजरातच्या (Gujarat)जामनगरमधील आहे. यात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती तो वेपर्सचा पुढा खोलून दाखवत आहे. मात्र यात तुम्हाला वेपर्सचा पुढ्यामध्ये मेलेला बेडूक दिसून येईल.

गुजरातमधील व्हायरल व्हिडिओनंतर(Video) संपूर्ण नेटकऱ्यांध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतू अनेक दिवसांपासून अशा गंभीर घटना समोर येत आहेत. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाताना मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Maharashtra Live News Update : सौदी अरेबियातून शेनलॉन्ग जहाज मुंबईत दाखल

टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

SCROLL FOR NEXT