Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला अन् चालक खाली चिरडला; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एक स्टंटबाजीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र ही स्टंटबाजी करताना एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. नक्की काय घडले ते पहा.

Tanvi Pol

Uttar Pradesh News: सध्या आपण पाहत आहोत वाहनांवर जीवघेणे स्टंटबाजी करण्याची नवीन क्रेझ निर्माण झाली आहे. धावत्या वाहनांवर हात सोडणे असो वा वेगात गाड्या पळवणे असो असे अनेक प्रकार पाहण्यास मिळतात.त्यातच सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय आहे नक्की प्रकरण?

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओ पाहून बऱ्याचदा अंगावर काटा उभा राहतो तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या तुम्हाला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे,ज्या व्हिडिओत दोन तरुण ट्रॅक्टरवर बसून स्टंट (Stunt_करताना पाहण्यास मिळत आहे.

ट्रॅक्टरवर बसून स्टंट करताना एका तरुणाचे हे मृत्यूचे कारण ठरले, त्या पुढच्या क्षणी असं काही तिथे घडतं की व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या आणि तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहतो. ट्रॅक्टर स्टंटच्या अपघाताच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात.

ट्रॅक्टरचा स्टंट जीवावर बेतला...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथील गावात दोन माणसांनी एकमेकांना ट्रॅक्टर खेचण्याची शर्यत लावली होती मात्र काही क्षणात दोघांपैकी एकाचा ट्रॅक्टर उलट्याने तो खाली पडून ट्रॅक्टरखाली चिरडला जातो. त्यानंतर तिथे असलेले सर्व नागरिक त्याच्या दिशेने धाव घेताना व्हिडिओत दिसत आहे. नकळत सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

सर्व स्टंटबाजीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''jist.news'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत. अनेक यूजर्संनी धोकादायक स्टंट कशाला करायचे असे लिहिले आहे तर काही जणांनी यानंतर अशा लोकांवर कारवाई करावी असे सांगितले आहे.

टीप : सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

SCROLL FOR NEXT