Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भररस्त्यात सिनेस्टाईल थरार..! महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्यांशी कडवी झुंज; पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही व्हायरल व्हिडिओतून पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: जगभरात कायम अनेक गुन्हाच्या घटना घडत असतात. कुठे घरफोडी होते तर कुठे दुकानात चोरी होते. मात्र गेल्या काही वर्षात भर दिवसा रस्त्यावरुन महिलाच्या गळ्यातील दागिने पळवण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. या प्रकारच्या चोरीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहण्यास मिळतात. परंतू सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्यात सोनसाखळी चोरणाऱ्यांना महिलेची कडवी झुंज झालेली आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल होत असून महिलेचे कौतुकही केले जात आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळ नाही. महिला रस्त्यावरुन जात असताना तिच्या हातामध्ये एक पिशवी आहे. दरम्यान एक बाईक स्वार तिथे येतो एक बाईक चालवत आणि तर दुसरा बाईकच्या पाठी मागे बसलेला आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की, दोघ ही महिलेच्या गळ्यातील दागिने पळवण्याचा प्रयत्न करतात मात्र महिलाना दोघांशी झुंज दिते. शेवटला दोघही भितीने तिथून पळ काढतात. सर्व प्रकार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@saamtv' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''सोनसाखळी चोरणाऱ्यांना महिलेची कडवी झुंज'' असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल १४ हजार नेटकऱ्यांनी पाहिला गेला आहे तर लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या संख्येंने नेटकऱ्यांनी व्हिडिओला प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''दोघांचे हात छाटले पाहीजेत'' तर ''बहुतेक याच्या घरी आई बहिण नसणार'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''असा चोप दिला पाहिजे पोलिसांनी की पुन्हा असे कृत्य करताना त्या पोरांनी 10 वेळा विचार केला पाहिजे'' अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : भाजपची यादी लवकरच जाहीर केली जाणार

Road Trip साठी खास लोकेशन, एकदा पाहाल तर प्रेमात पडाल!

Radhakrishna Vikhe Patil: 'त्या' वादावर राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले, जयश्री थोरात यांच्याबद्दल काय म्हणाले? वाचा...

VIDEO : महायुतीत उमेदवाराची अदलाबदल, भाजपच्या मुरजी पटेलांच्या हाती धनुष्यबाण! अंधेरी पुर्णमधून लढणार?

Latur Crime : जागेवर झोपल्याने राग अनावर; डोक्यात दगड टाकून संपविले, लातूरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT