Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक...! घराबाहेर रांगोळी काढणाऱ्या दोन मुलींना भरधाव कारनं चिरडलं, संपूर्ण घटनेचा थरार CCTVत कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत एक थरारक अपघात कैद झालेला आहे.

Tanvi Pol

Indore Viral Video: गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक घर आनंद-उल्हासाने दिवाळी साजरी करत आहे. मात्र मध्य प्रदेशमधून एक हृदयद्रावर घटना समोर आलेली आहे. ज्या घटनेत घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या दोन दोन मुलींना भरधाव कारनं चिरडलं आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घराबाहेर दोन मुली रांगोळी काढत बसलेल्या दिसत आहे. रस्त्यावरुन काही व्यक्तींची ये-जा सुरु आहे. मात्र काही क्षणात रस्त्याच्या एका दिशेने भरधाव वेगात कार येताना दिसत आहे. काही वेळात ही कार भरधाव वेगात येते आणि मुलींना कारनं चिरडून तिथेच अडकली जाते. त्यानंतर रस्त्यावर एकच गोंधळ उडतो मात्र तो कारमधील व्यक्ती बाहेर येऊन तेथून पळ काढतोय. रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(cctv) संपूर्ण घटना कैद झालेली आहे.

सदर व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका फुल स्पीड कारने दोन मुलींना चिरडले. मुली घराबाहेर रांगोळ्या काढत होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे'' असे लिहिण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधं न घेता डायबिटीज होईल बरा! स्वयंपाकघरातील 'हे' ३ मसाले रक्तातील साखर करतील कमी

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Shocking : घरात कोणीही नसताना सैतान जागा झाला, तोंड,हात बांधून भावाकडून बहिणीवर बलात्कार

Work from home health risks: लॅपटॉपची उष्णता शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनी दिला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा

सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT