Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: २५ वर्षांनी ठरला माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदराचा कार्यक्रम अन्...अचानक लागली शाळेला आग; VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कधी तरी असे व्हिडिओ व्हायरल होतात की ते पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही तर काही व्हिडिओ पाहून मन हेलावून जात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Nanded Viral Video: नांदेड शहरातील एका नामांकित शाळेतील गेट-टुगेदरचा कार्यक्रम अनपेक्षित घटनांमुळे गोंधळात सादर झाला. तब्बल २५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर आयोजित करण्यात आला होता. अनेकजण या प्रसंगी उत्साहाने एकत्र आले होते शिवाय शाळेच्या आवारात रंगीबेरंगी सजावट, रांगोळ्या, स्वागत बॅनर्स, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, या सगळ्या आनंदमय वातावरणाला अचानक लागलेल्या आगीमुळे गालबोट लागलं.

नेमके घडले तरी काय?

नांदेड (Nadend)शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये पंचवीस वर्षानंतर माजी विद्यार्थी ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळी काढून सजावट ही करण्यात आली होती, मात्र उत्साहाच्या भरात शाळेच्या बाहेर फटाके लावल्याने शाळेच्या वरच्या मजल्यावर असलेल्या फर्निचर आणि इतर लाकडी वेस्टेज भागाला आग लागल्याची घटना घडली आहे.

आग लग्नाचे कळतात सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेरून व्यवस्थित ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही संपूर्ण आग दोन तासात विजवली आहे. शाळेचे फायर ऑडिट झाली नसल्याची माहिती अग्निशमन जवानांच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे

सध्या समाजमाध्यमांवर या घटनेचा व्हिडिओ(Video) आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही फोटो पाहून नेटकरी हैराण झालेले आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''सर्वजणांच्या आनंदावर पाणी पडलं'' तर अनेकांनी म्हटलं की,''खुप वाईट झालं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes complications: या 6 अवयवांवर मधुमेहाचा होतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Sunil Grover: फुटपाथवर झोपलेला दिसला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडिओ पाहून चाहते हैरान, म्हणाले, 'अहंकार नसल्यावर...'

SCROLL FOR NEXT