Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भंगारवाला वापरतोय ८५ हजारांचा Iphone, लेकाकडे १.५० लाखाचा फोन; VIDEO पाहाच!

Viral Video: सोशल मीडियावर एका भंगारवाल्या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची गेल्या अनेक वर्ष झाले क्रेझ वाढत आहे. यात सध्या सर्वत्र आयफोनच्या नवीन फोनची चर्चा होत आहे. भारतात आयफोन १६ येण्याआधीच अनेकांनी त्याची आधिकच बुकिंग केली होती. एवढेच नाही तर मुंबई आयफोन १६ खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दोन दिवसांआधी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. आयफोन १६ च्या खरेदीसाठी केलेल्या कारनाम्यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असते. अनेक व्हिडिओही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. सध्या आयफोन संबंधित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका भंगारवाल्याकडे चक्क २ आयफोन दिसून आलेले आहेत, ज्यात आयफोन १६चा ही समावेश आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एक गरीब व्यक्ती दिसून येत आहे. ज्याच्या अंगावर साधे पूर्ण कपडेही नाहीत. जी कपडे आहेत तीही अर्धी फाटलेली आहेत. व्हायरल व्हिडिओती जो व्यक्ती आहे जो एक भंगारवाला असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजते. व्हायरल व्हिडिओतील (Video)परिसर संपूर्ण एका बांधकाम क्षेत्रातील दिसून येतोय. ज्या तो व्यक्ती उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये चक्क आयफोन(i Phone) दिसून येत आहे.

या व्यक्तीकडे आयफोन पाहून तिथे असलेला एक व्यक्ती त्या भंगारवाल्याला विचारतो की,'' मोबाईल दाखव असा...तु काय काम करतोय?.. तर त्यावर आयफोन हातात असलेला व्यक्ती बोलतो मी भंगारवाला आहे... काच, बॉटल्स सर्व अशा वस्तू गोळा करतो. त्यानंतर त्याला विचारण्यात येते, तू मोबाईल कितीला घेतला तर तो बोलतो पंच्यायशी हजाराला घेतला आणि जो दुसरा आयफोन १६ घेतला आहे तो एक कोटी आणि एक लाख ऐशी हजारला घेताल मात्र जो नवीन घेतला तो माझ्या मुलासाठी घेतला. एवढेच नाही तर मुलाला सांगितलं टक्केवारी जास्त आली की घेणार, मग मुलाला टक्के जास्त मिळाले म्हणून त्याला ही एक आयफोन घेतला. सर्व व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तो तुम्हाला एक्सवरील '@GangappaPujar07' या अकाउंटवर पाहता येईल. व्हिडिओ शेअर करत ''हेच बघायचं राहिलेलं...' भंगारवाला वापरतोय ८५ हजारांचा आयफोन...'' असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये झुरळं अन् ढेकणांचा सुळसुळाट, प्रवाशांची होतेय गैरसोय; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जालन्यात प्रशासन ॲक्शन मोडवर

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT