Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News : क्षणात झालं होत्याचं नव्हतं; विजेच्या तारांमुळे दोन चिमुकल्यांनी गमावला जीव; घटना सीसीटीव्हीत कैद

Shocking Cctv : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यातच एक धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो पाहून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंध्र प्रेदशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा धक्का बसल्याने एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झालेला आहे. मुलांच्या अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनेने कुटुंबियांना जोरदार धक्का बसला असून परिसरात शांततेचा वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आंध्र प्रेदशातील(Andhra Pradesh) कडप्पा जिल्ह्यात दोन शाळकरी मुले एकाच सायकलवरुन जात असताना रस्त्यावर असलेली विजेची तार अडकली. काही क्षणातच त्यांच्या सायकलला सुद्धा आग लागते आणि दोघ जमिनीवर पडतात.यात एका मुलाचा मृत्यू होतो तर एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर भररस्त्यात विजेच्या(electricity) तारा कशी पडल्या, असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे.काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्कामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता,जी महिला पावसाच्या पाण्यातून वाट काढत जात होती.दरम्यान महिलेला विजेच्या तारांचा धक्का लागतो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक परिसर (premises)दिसून येतोय.काही वेळात या व्हिडिओत दिसणाऱ्या रिकाम्या रस्त्यावर ती दोन मुले सायकलवरुन येत आहेत.एकजण सायकल चालवत आहे तर एकजण त्याच्यापाठी मागे बसलेला आहे.काही वेळातच मुले रस्त्याच्या पुढे येतात मात्र रस्त्यावर असलेल्या विजेच्या तारेशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे दोघेही जमिनीवर कोसळतात.खाली पडताच त्यांच्या सायकलला आग लागण्यास सुरुवात होते.त्यानंतर परिसरातील नागरिक जमा होतात आणि मुलांना रुग्णालयात नेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT