Truck Accident Saam Tv
व्हायरल न्यूज

Truck Accident: ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, पार्किंग करताना हँडब्रेक लावायला विसरला; 3 वाहनांना धडक देत खड्ड्यात पडला, VIDEO

Shocking Truck Accident Viral Video: एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडला आहे. हँडब्रेक न लावल्यामुळे ट्रक मागे सरकत कारवर आदळला. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

आजकाल रस्त्यावरून प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. काहीवेळेस इतरांच्या चुकांमुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडीओमध्ये तुम्हाला एका चुकीमुळे कशी दुर्घटना घडते हे दिसत आहे. एक चालक ट्रक पार्क करून हँडब्रेक लावायला विसरतो त्यानंतर जे घडतय ते भयंकर आहे.

रस्त्याच्या कडेला एक मोठा ट्र्क उभा असलेला दिसत आहे. ट्रक पार्क करून चालक कामानिमित्त निघून गेला आहे. चालक ट्रकचा हँडब्रेक लावायला विसरला आहे. यानंतर ट्रक हळहळू उतारावरून सरकू लागला आहे. सुरूवातीला याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही परंतू अचानक ट्रक मागे उभ्या असलेल्या कारला धडकतो. यानंतरही ट्रक मागे मागे येत दुसऱ्या वाहनांना आदळतो आणि नंतर कारसह ट्रक खड्यात पडतो. या दरम्यान काही लोक ट्रक थांबवण्यासाठी धावताना दिसतात. परंतू तो पर्यंत उशीर झालेला असतो.

या संपूर्ण प्रकरणाला ट्रक चालक जबाबदार असल्याचं दिसत आहे. ट्रक चालकाने हँडब्रेक न लावल्यामुळे ही घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे जीव देखील धोक्यात जाऊ शकतो. यामुळे ट्रक चालकांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचं आहे.

सोशल मिडियाच्या @InsaneRealitys एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ,'हँडब्रेक लावायला कधीही विसरू नका' असं म्हटलं आहे. या व्हिडीओला लाखो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने, एक छोटीशी चूक आणि लाखोंचे नुकसान, तर आणखी एकाने, ड्रायव्हरचा निष्काळजीपणा मृत्यू आणि विनाश दोन्हींना कारणीभूत ठरू शकतो. अनेकांनी चालकाच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT