Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फोनचा नाद लय बेक्कार! बाळासह महिला पडली उघड्या मॅनहोलमध्ये; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चालताना मोबाईल पाहण्याचे वेड किती महागात पडू शकते ते दिसत आहे.नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Women Shocking Accident: गेल्या काही वर्षापासून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसते.दिवस असो वा रात्र मोबाईल त्यांना हवाच असतो.मोबाईच्या नादात अनेकदा भयंकर अपघात घडले आहे त्यात त्यांना जीवही गमवावा लागला आहे.त्याच सध्या अशाच एका घटनेसंबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,ज्यात महिला फोन बघत बघत रस्त्यावरुन जात असते,मात्र जे पुढं घडलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

सोशल मीडियावर मोबाईच्या अति वापरामुळे कोणत्या घटना घडतात त्याचे अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात.अनेकदा जो मोबाईलच्या वापरामुळे स्वत:चा सोबत बाजूच्यांनाही त्याचा त्रास होत असतो.सध्याचा व्हायरल व्हिडिओही मोबाईलचा भररस्त्यात जात असताना वापर करणं एका महिलेला चांगलेच महागात पडलेले आहे.ज्यात तिच्यासोबत तिच्या चिमुकलीसोबत भयंकर घडलेले आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,''एक महिला रस्त्यावरुन जात आहे आणि तिच्यासोबत तिने उचलून घेतलेल लहान बाळंही आहे.काही वेळात ती रस्त्यावरुन जात असताना तिचे संपूर्ण लक्ष मोबाईल फोनमध्ये असते.रस्त्यावरुन जात असताना तिला रस्त्यावर असलेला गटाराचा खड्डा दिसत नाही.त्यानंतर ती तिच्याकडे असलेल्या चिमुकल्याला घेऊन त्या खड्ड्यात पडते.मात्र त्यानंतर त्याच रस्त्यावर असलेल्या काही नागरिकांना संपूर्ण प्रकार दिसताच ते सर्व महिलेच्या मदतीसाठी धावून जातात आणि दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्याते यशस्वी होतात.सर्व थरकाप उडवणारी घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

व्हायरल(Viral) झालेला व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र इन्स्टाग्रामच्या 'explorewithdeepti' या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अनेकांनी कमेट्मध्ये लिहिले आहे,''अरे लक्ष ठेवायला पाहिजे,चिमुकला सोबत आहे तर अधिक लक्ष देयला पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बापरे खुप वाईट झालं'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : धक्कादायक घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT