Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईतील भयाण वास्तव! रेल्वे ट्रॅकमध्येच थाटला संसार; तिथेच झोपणं, खाणं अन् लहानग्याचं बागडणं, VIDEO व्हायरल

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर मुंबई शहरातील एक धक्कादायक परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात लोकल ट्रॅकवरच काही लोकांनी संसार मांडला आहे.नक्की काय आहे व्हिडिओता पाहा.

Tanvi Pol

Viral Mumbai Video: मुंबई शहराला मायानगरी म्हणून ओळखले जाते. जिथे जगभरातील अनेक लोकं आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येतात.मात्र, या शहरात टिकून राहण्यासाठी काहींना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशाच संघर्षमय वास्तवाचं दर्शन घडवणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकलचा मार्ग दिसत आहे.ज्या रेल्वे रुळाच्या मधोमध काही नागरिक दिसून येत आहे.ज्यात काही लहान मुलांचा समावेश आहे.काही व्यक्ती झोपलेले आहे तर काही जेवण बनवताना दिसत आहे.सर्व धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सर्व व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.व्हिडिओ नक्की कधीचा आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहे.ऐढवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

मुंबई रेल्वे रुळावरील ही परिस्थिती पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''मुंबई शहरात काहीही होऊ शकत''तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,''मुंबई शहरात लोक जगण्यासाठी काहीही करतात'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''जीवनाला घाबरत नाहीत'' तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया (reaction)केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

SCROLL FOR NEXT