Woman Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Woman Fight Video: ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला OYO च्या मालकीणीने धू-धू धुतलं, Video व्हायरल

फरीदाबादमध्ये ओयो हॉटेलच्या मालकिणीने ट्रॅफिक पोलिसाला चप्पलने मारहाण केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Manasvi Choudhary

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका महिलेने वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. ऑन ड्यूटी असणाऱ्या या वाहतूक पोलिसाला महिलेने मारहाण केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी वाहतूक पोलिसाला या महिलेने का मारले आहे? हा वाद नेमका कशावरून झाला? याचा तपास घेत आहेत.

फरीदाबादच्या सरूरपूर भागात ही घटना घडली आहे. एका ओयो हॉटेलची मालकीण वाहतूक पोलिसाला मारहाण करत आहे. व्हिडीओमध्ये, वाहतूक पोलिस आणि एक- दोन तरूण उभे आहेत. वाहतूक पोलिस या महिलेला हात जोडून विनवणी देखील करताना दिसत आहे. परंतू महिला त्याचे काहीही ऐकत नाही आणि त्याला चप्पलने मारहाण करत आहे. याचदरम्यानचा या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस हे दयाल हॉस्पिटल चौकात तैनात होते. यावेळी त्यांना सरूरपूर परिसरात नॅशनल हॉटेलसमोर वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळाली. वाहतूक पोलिस तेथे गेले असता त्यांना एका ओयो हॉटेलच्या बाहेर वाहने उभी असलेली दिसली. यावेळी वाहतूक पोलिसांनी ओयो मालक आणि तेथील दोन कर्मचाऱ्यांना सांगितले की, रस्त्यावर वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी ओयो हॉटेलची ही महिला संतापली आणि तिने वाहतूक पोलिसाला मारहाण करायला सुरूवात केली त्यांनी वाहतूक पोलिसाला हॉटेलमध्ये खेचत मारहाण केली आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. ओयो हॉटेलच्या मालक आणि इतरांविरुद्ध मुझफ्फरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर वाहतूक पोलिसांच्या पीआरओचेही निवेदन आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT