shocking moment caught on camera in local train man performs vulgar act in front of woman sparking public anger Saam Tv
व्हायरल न्यूज

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका लोकल ट्रेनमधील आहे. नेमके काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Train News: रोज हजारो महिला-पुरुष, विद्यार्थी, नोकरदार लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका तरुणीसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य केलं आहे. हा प्रकार ट्रेनमध्ये भर गर्दीत घडला असून, हा व्हिडिओ पाहून जनतेचा संताप अनावर झाला आहे.

व्हिडिओमध्ये नोदवलेली विकृती

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल ट्रेनच्या डब्यातील आहे. पण नेमकी घटना मुंबई लोकल ट्रेनमधील आहे का किंवा देशातील कोणत्या लोकल ट्रेनमधील ते अद्याप समजू शकले नाही. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये गर्दी आहे, लोक उभे आहेत, काही बसले आहेत. याच गर्दीत एक व्यक्ती ट्रेनच्या दरवाजाजवळ बसलेला असतो त्यानंतर तो तरुणीला पाहून अश्लील वर्तन करताना दिसतोय. तरुणीने आपला मोबाईल काढून त्याचे कृत्य चित्रीत केलं आणि नंतर सोशल मीडियावर पोस्ट केलं. पाहता पाहता तो व्हिडिओ व्हायरल झाला.

काही तासांतच हा व्हिडिओ देशभरात वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि पाहता पाहता लाखो नेटकऱ्यांनी पाहिला. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील _.legalbud या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटना कुठली आणि काय घडली याबाबात सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

महिलांचा संताप

हा व्हिडिओ पाहताच अनेक महिलांनी शिवाय काही तरुणांनी सुद्धा बऱ्याच संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''दररोज अशा घटना होत आहेत तरी योग्य ती कारवाई का केली जात नाही'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''खुपच धक्कादायक घटना आहे'' अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

SCROLL FOR NEXT