Viral Accident Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: भर गर्दीत रिक्षाचालक सुस्साट; पायी चालणाऱ्या वृद्धाला उडवलं; सीसीटीव्हीत अपघाताची दृश्य कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru Accident Viral Video

भरधाव वेगात निघालेल्या रिक्षेच्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना बंगळूरमध्ये घडली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की,' रस्त्यावर वाहनांची ये-जा होत आहेत. रस्त्याच्या एका बाजूल काही दुकाने आहेत तर दुसऱ्या बाजूस एक कार उभी आहे. कारच्या पाठीमागून एक वयोरुद्ध व्यक्ती आपल्याला चालत येताना दिसते. काही वेळानंतर वयोरुद्ध व्यक्ती चालत असताना त्याच्या पाठीमागून एक भरधाव वेगात रिक्षा येत असते.

ज्यावेळेस रिक्षा येते आणि त्यावयोरुद्ध व्यक्तीना जोरदार धडक मारते. त्यावेळेस येणाऱ्या कारला ते जाऊन आदळतात. तात्काळ रस्त्यावरील बाकीचे व्यक्ती तिथे जमा होतात. आपल्याला व्हिडिओत दिसते की रिक्षा चालक डावीकडून दुचाकी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता.

नेमकं आहे हे प्रकरण...

व्हायरल व्हिडिओ एक्स (ट्वीटर)प्लॅटफॉर्मवरील@HateDetectorsया अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. सर्व घटना बेंगळुरूच्या लगेरे भागातील आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. याआधीही भरधाव वेगात अनेक निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे आणि त्या थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक यूजर्संनी या चालकावर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत तसेच अनेक सोशल प्लॅटफॉर्म व्हिडिओ फुटेज शेअर करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT