Shocking Video Saam TV
व्हायरल न्यूज

Shocking Video: ट्रेनमधून फोन चोरण्याचा प्रयत्न फसला, चोर एक किलोमीटरपर्यंत लटकत गेला

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक चोर चोरी करण्याआधी हजार वेळा विचार करेल. नक्की असे काय घडते ते पाहा.

Tanvi Pol

Mobile Snatching Video: रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराची चांगलीच गोची झाली आहे. चोराने खिडकीतून हात घालून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण चोराचा अंदाज चुकला आणि त्याला आपला जीव गमावण्याची वेळ आली. हा सर्व थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

फोन हिसकावण्याचा प्रयत्न अंगलट

घडले असे की, एक प्रवासी रेल्वेच्या खिडकीत बसून मोबाईवर बोलत असतो. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर असलेला चोर धावत येतो आणि खिडकीतून मोबाईल (Mobile) हिसकावण्याचा प्रयत्न करतो. परंतू, त्या प्रवाशाने आपला मोबाईल घट्ट पडला त्यामुळे चोराचा हात चक्क खिडकीतच अडकला आणि ट्रेनही सुरु झाली.

चोर ट्रेनसोबत एक किलोमीटर ओढला गेला!

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, चोराला प्रवाशांनी पकडल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर ट्रेनला लटकत गेले. चोरीच्या या प्रयत्नामुळे चोर सुमारे एक किलोमीटरपर्यंत ट्रेनला लटकत राहिला. संपूर्ण घटना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केली आहे आणि सोशल मीडियावरही शेअर करण्यात आली आहे.

@BimaruKumari या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना बिहार येथील असल्याचे समजते. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. घटना पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अशा सोबत असंच केलं पाहिजे'' तर अशा अनेक यूजर्संनी संतापजनक तर मजेशीरही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: चोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT