व्हायरल न्यूज

Mumbai Police Chaleya Song Reel: शाहरुखच्या 'चलेया' गाण्यावर मुंबई पोलिसाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

Shahrukh Khan Jawan Movie Song: शात मुबंई पोलीस अमोल कांबळे यांनी देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स करत व्हिडीओ शूट केला आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Police Dance Video:

शाहरुखचा जवान चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून २ दिवसांत चित्रपटाने मोठा विक्रम रचला आहे. चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दिली असून गाण्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. जवान चित्रपटांच्या गाण्यांनी मुंबई पोलिसाला देखील भूरळ घातली आहे. (Latest Marathi News)

जवान चित्रपटातील 'चलेया' हे गाणं फार चर्चेत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडीओ देखील बनवले आहेत. सध्या हे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतायत. अशात मुबंई पोलीस अमोल कांबळे यांनी देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स करत व्हिडीओ शूट केला आहे.

अमोल कांबळे यांचे या आधी देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. आधी टिकटॉकवर त्यांनी आपली छाप उमटवली. त्यानंतर इंस्टाग्राम रील्समधून ते प्रसिद्ध झालेत. अमोल कांबळेंनी शाहरुखच्या जवान चित्रपटातील "चलेया" गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फार खूश झालेत.

नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अमोल कांबळे यांना बॉलिवूड सिनेविश्वाची फार आवड आहे. ते उत्तम डान्स करतात आणि बॉलिवूडमधील प्रत्येक गाजलेल्या गाण्यावर व्हिडीओ रेकॉर्ड करतात. @amolkamble2799 हे त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट आहे. आपल्या डान्सचे सर्वच व्हिडीओ त्यांनी या अकाउंटवर पोस्ट केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT