Self Defense Techniques Saam TV
व्हायरल न्यूज

Self Defense Techniques : मागून अचानक कुणीतरी आलं आणि तुमचं तोंड दाबलं तर स्वतःला कसं वाचवाल? सेल्फ डिफेन्सचा व्हिडिओ पाहाच

Self Defense Techniques For Students Video : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मात्र प्रत्येकवेळी आपल्याला कुणाची मदत मिळेल आणि आपण संकटातून बाहेर पडू असे नाही.

Ruchika Jadhav

राज्यात आणि देशात विविध ठिकाणी अद्यापही महिलांवरील अन्यान आणि अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे महिला अजूनही पूर्णतः सुरक्षित आहेत असं म्हणता येणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मात्र प्रत्येकवेळी आपल्याला कुणाची मदत मिळेल आणि आपण संकटातून बाहेर पडू असे नाही.

प्रत्येक मुलीला स्वतःचे रक्षण स्वतः करता येणे गरजेचे आहे. अनेकदा भर रस्त्यात महिलांचा पाठलाग करणे, त्यांना मागून येऊन पकडणे आणि तोंड दाबणे अशा घटना घडतात. आता तुम्हाला देखील अशा पद्धतीने कुणी त्रास दिला तर, अशावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या तावडीतून आधी सुटणे गरजेचे आहे. त्याच्या जाळ्यातून सुटल्यानंतर आपण पोलीस किंवा अन्य हेल्पलाईनपर्यंत पोहचू शकतो.

सोशल मीडियावर सध्या अशा परिस्थितीमधून स्वतःची सुटका कशी करावी याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओचा प्रत्येक तरुणी आणि महिलेला फायदा होणार आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की,एक तरुण एका तरुणीला मागे येऊन एका हाताने पोट पकडतो आणि दुसऱ्या हाताने तिचे तोंड दाबून ठेवतो. आता या परिस्थितीतून स्वतःला सोडवण्यासाठी ही तरुणी आधी बराच प्रयत्न करते. आपल्या तोंडावरून तरुणाचा हात बाजूला करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र तरुण जास्त ताकतवर असल्याने तरुणीला हे करता येत नाही. आता असे करत बसण्यापेक्षा काय केले पाहिजे हेच तरुणीने दाखवून दिले आहे.

तिने आपल्या हातांनी सरळ मागे उभा असलेल्या तरुणाच्या मानेवर आपलं कोपर मारलं आहे. कोपरचा फटका जोरात लागतो त्यामुळे हा तरुण कळवळतो आणि तरुणीला सोडून दूर जातो. तो मागे होताच तरुणी पुन्हा एकदा त्याच्या कमरेवर जोरदार लाथ मारते. अशा पद्धतीने सर्व तरुणींना आपलं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे.

@shabnambano या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट देखील करण्यात आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT