Satara Peacock Viral :  Saam tv
व्हायरल न्यूज

Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

Satara Peacock Viral video on social media : साताऱ्यातील हा बिनधास्त मोर पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतो. मोबाईल कॅमेऱ्यासमोरही पोझ देतो.

ओंकार कदम

सातारा : मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी. या पक्षाची एक झलक देखील लक्ष वेधून घेते. सर्वांचं क्षणात लक्ष वेधून घेणारा मोर कधीही लोकांजवळ थांबत नाही. जमीनीवर उभ्या राहिलेल्या मोराला माणसाची चाहूल लागल्यास पटकन उडून जातो. मात्र, साताऱ्यात या उलट स्वभावाचा मोराची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर साताऱ्यातील माणसाळलेल्या मोराचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. साताऱ्यातील हा बिनधास्त मोर पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतो. मोबाईल कॅमेऱ्यासमोरही पोझ देतो.

साताऱ्यातील माणसाळलेला मोर रोज पिसारा फुलवून तासंतास लोकांसमोर नाच करतो. या मोरासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी होते. उलट स्वभावाच्या मोराचा सातरकर लोकांनाही लळा लागला आहे.

मोर लोकांमध्ये रमतो

साताऱ्यात चक्क एका जंगलातील पिसारा फुलवलेल्या मोरासोबत कोणी सेल्फी घेतय तर कोणी त्याचे फोटोसेशन करत आहे. या मोराचा आजूबाजूला 50 लोकांचा गराडा असतानाही हा मोर लोकांसोबत तासंतास रमतो.

मोर रोज एकाची ठिकाणी येतो

साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून दररोज एक मोर सकाळी 7.30 वाजता येतो. साताऱ्यातील मोर पिसारा फुलवून लोकांचे लक्ष वेधून घेतोय. तासभर हा मोर सर्वांसोबत या ठिकाणी थांबतो. त्यानंतर पुन्हा जंगलात निघून जातो. मात्र रोज त्याच वेळी पुन्हा त्याच ठिकाणी आपली हजेरी देखील लावतो. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

सेल्फीसाठी धडपड

साताऱ्यातील या मोराची सेल्फी घेण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळत आहे. मोर देखील कॅमेरासमोर पोझ देतो. अनेक महिला, लहान मुले, तरुण मंडळी मोराचा फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे संपूर्ण साताऱ्यात या मोराची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

Maharashtra News Live: शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, नेमकं झालं काय?

PM Modi: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या, पण...' पंतप्रधान मोदींनी GEN-Z ना केलं मोठं आवाहन

Kothimbir Vadi Recipe: घरच्या घरी बनवा खमंग कोथिंबीर वडी; चहासोबत लागेल भन्नाट चव

SCROLL FOR NEXT