बस चालकाला बेदम मारहाण, सांगलीतील मिरजेमधील घटना; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल...  Google
व्हायरल न्यूज

Sangli Viral Video: बस चालकाला बेदम मारहाण, सांगलीतील मिरजेमधील घटना; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल...

Viral Video: मिरज एसटी बस स्थानकात दिव्यांग प्रवाशाला बस न थांबविल्याने संतप्त नातेवाईकांनी चालकाला मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिरज एसटी बस स्थानकात घुसून एका बस चालकाला संतप्त नातेवाईकांनी चक्क मारहाण केली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताय.

सांगलीच्या पटेल चौकात एका दिव्यांग प्रवाशाला उतरायचे होते, मात्र बस न थांबता पुढे गेली. त्यामुळे प्रवाशाच्या नातेवाईकांचा संताप उफाळून आला. नातेवाईकांनी बसचा पाठलाग करून मिरज एसटी स्थानकात बसला गाठले आणि चालकाला मारहाण केली.

या घटनेदरम्यान काही बस चालक आणि नागरिकांनी हस्तक्षेप करत त्या चालकाला नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. या घटनेमुळे बस स्थानकात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. परंतु, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट देखील केल्या आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT