Chhatrapati Sambhaji Nagar saam tv
व्हायरल न्यूज

Chhatrapati Sambhaji Nagar: गळ्यावर कोयता ठेवत सव्वातीन लाखांचा ऐवज लुटला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Chhatrapati Sambhajinagar Robbery: एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम प्रकाश नेमाने यांच्या हरी ओम मल्टीसर्विस ग्राहक सेवा केंद्रात चोरट्यांनी सव्वातीन लाख रुपयांची चोरी केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Dhanshri Shintre

छत्रपती संभाजीनगरच्या विटावा गावात एक धक्कादायक चोरी घडली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी देखील चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम प्रकाश नेमाने यांच्या हरी ओम मल्टीसर्विस ग्राहक सेवा केंद्रात चोरट्यांनी सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी पहिल्यांदा ग्राहक सेवा केंद्रातील दीड लाख रुपये चोरले आणि नंतर घरात झोपलेल्या नेमाने यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने देखील चोरले. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात चोरट्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून नेमाने यांच्या कुटुंबाला भीती घातली, त्यांना ताब्यात घेतलं आणि सगळा ऐवज चोरून फरार झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत. या चोरीसंबंधी तपास सुरू असून, पोलीस प्रशासन त्यासाठी विविध पद्धतींचा वापर करीत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला.

पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि त्या ऐवजाचे पुनर्प्राप्तीचे प्रयत्न चालू आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये चिंता आणि भय निर्माण झाले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस अधिक मेहनत घेत आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समिती कसला अभ्यास करणार? कर्जमाफीवरून ठाकरे आक्रमक

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

Electricity Bill: वीज बिलात ऐतिहासिक कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या किती फायदा होणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली; शिंदेसेनेचे 2 नेते अडचणीत, पालिका निवडणुकीत फटका बसणार?

Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासा

SCROLL FOR NEXT