Dhanshri Shintre
काल राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील लोहगाव परिसरात ४२.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
पुण्यातील लोहगाव सह इतर परिसरात ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे.
अकोला, वाशिममध्ये काल पारा ४२.४ अंशावर गेला आहे.
वर्धा, यवतमाळ नागपूरमध्ये सुद्धा उन्हाळा कायम असून ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात परभणीमध्ये ४२.४, बीडमध्ये ४१.९, धाराशिवमध्ये ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्राचे चित्र पाहता मालेगावमध्ये ४२.४ अंश, जळगाव, ४२.३, सोलापूर ४० तापमानाची नोंद झाली आहे.