CCTV Footage saam tv news
व्हायरल न्यूज

CCTV Footage: भरधाव रिक्षाची दुभाजकाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर; घटनेचं CCTV फुटेज समोर

Auto Rickshaw Accident Video: महाराष्ट्रातील भिंवडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीनजण गंभीर जखमी आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhiwandi News

महाराष्ट्रातील भिंवडीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीनजण गंभीर जखमी आहेत. भरधाव वेगात येणारी ऑटो थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला आहे.सध्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडीमध्ये शुक्रवार(ता.८)रोजी हा अपघात झाल आहे.या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक दुचाकीस्वार रस्त्यावरील दुभाजकामधून रस्त्याच्या पलीकडे जात आहे.

त्या दरम्यान त्याच रस्त्यावरुन एक भरधाव वेगात एक ऑटो रिक्षा येते आणि थेट दुभाजकावर धडकते. दुभाजकावर धडकल्यानंतर रिक्षा रस्त्याच्या पलीकडेच जाऊन पडते. मात्र काही क्षणासाठी रस्त्यापार करणारा दुचाकीस्वार बचावतो. अपघताच होताच रस्त्यावरील अनेक लोक रिक्षेच्या दिशेने धाव घेताना व्हिडिओत दिसत आहेत.

या भीषण अपघातात ऑटोमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी दोनजणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले.@PTI_Newsया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT