cctv captures the dramatic moment when a compound wall collapses in Airoli Sector 20, Navi Mumbai Saam Tv
व्हायरल न्यूज

नवी मुंबईत संरक्षक भिंत कोसळली, गाड्या पडल्या खड्ड्यात; सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक दृश्य कैद

Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-20 मध्ये रहिवासी इमारतीजवळील संरक्षक भिंत कोसळली. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून, भिंतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या थेट खड्ड्यात कोसळल्या आहेत. शेजारील बांधकामामुळे दुर्घटना घडल्याचा संशय आहे.

Tanvi Pol

Navi Mumbai News: ऐरोली सेक्टर-20 मध्ये एक धक्कादायक घटना घडली असून, रहिवाशी इमारतीची संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही भिंत कोसळतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

ही घटना(incident) सकाळच्या सुमारास घडली. रहिवाशी इमारतीच्या कंपाऊंडची भिंत काही सेकंदांतच जमीनदोस्त झाली. विशेष म्हणजे, या भिंतीला लागून काही दुचाकी गाड्या उभ्या होत्या. भिंत कोसळल्यानंतर त्या सर्व गाड्या थेट बाजूच्या खड्ड्यात पडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बांधकामामुळे कोसळली भिंत?

घटनास्थळी जवळच एक नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या बांधकामामुळेच भिंतीच्या बाजूची जमीन सैल झाली होती. सततच्या खणकामामुळे भिंतीच्या पायाला धक्का बसला आणि अखेरीस ती भिंत कोसळली. या परिसरातील अनेक रहिवाशांनी याआधीही या बांधकामाबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला थरार

या घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, काही क्षणांपूर्वी सर्वकाही सुरळीत आहे. अचानक भिंतीला झटका बसतो आणि ती संपूर्णपणे खाली कोसळते. काही सेकंदांतच सिमेंटच्या ढिगाऱ्यात दुचाकी गाड्या गायब होतात. एक क्षण असा येतो की, एखादी व्यक्ती जर तिथे उपस्थित असती तर मोठी जीवितहानी झाली असती.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Somnath Suryawanshi Death: 'सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीतच'; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

SCROLL FOR NEXT