Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गुटखा थुंकण्याचा राग अनावर! लोकलमध्ये जोरदार हाणामारी; VIDEO पाहून चकीत व्हाल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही व्यक्तींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ हा मुंबई लोकल ट्रेनमधील आहे. तुम्हीही एकदा हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

Mumbai Local Train: मुंबई शहरात येताच प्रत्येकाच्या कानावर मुंबई लोकलची चर्चा कानावर पडते. एवढेच नाही तर मुंबई बाहेरून येणारा प्रत्येकजण एकदा तरी मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतो. प्रवास करत असताना मुंबई लोकलमधील दररोज घडणारे भाडंण, वाद नवीन माणसाला पाहण्यासाठी मिळतात, त्यातच सध्या लोकलमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकल ट्रेन दिसत आहे. लोकल (Local)ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे मात्र त्यात शांत असलेल्या तिथे अचानक दोन व्यक्तीमध्ये वाद सुरु होतो मात्र हा वाद चक्क हातापायीवर येतो. व्हिडिओत एक व्यक्ती दिसत आहे जो यांची हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करतोय पंरतू अनेक व्यक्ती संपूर्ण राडा पाहत आहे. त्यातील एका व्यक्तीने संपूर्ण वादविवाद अन् हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

हाणामारीचे कारण तरी काय?

हाणामारीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत हाणामारी कोणत्या कारणावरुन झाली त्याचे कारण सांगितले आहे, जे असे की,''मुंबई लोकल ट्रेनमध्ये गुटखा थुंकण्यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली''.

हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कोणी कोणाला मारल ते समजलं नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बरोबर केलं'' तर अजून नेटकऱ्यांनी म्हटले आहे की,''काय राव हे नेहमीच आहे'', अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये 'उन्हाळ्यात पावसाळा'; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

Hair Oiling Tips: ओल्या केसांवर तेल कधी लावावे?

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मंगळवेढ्यात दहा तोतया विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT