दिवाळीत आता 10, 20 आणि 50 च्या नोटांचा तुटवडा भासणार आहे असा दावा करण्यात आलाय...आरबीआयच्या नावानेच हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आता एकच खळबळ उडालीय...खरंच आता 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा कमी होणार आहेत का...? हे छोटं चलन जर कमी होणार असेल तर सुट्टे पैसे आणायचे कुठून...? सगळीकडेच आता ऑनलाईन व्यवहार करायचे का...? असे सवाल उपस्थित केले जातायत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केलीय...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
दिवाळीत नवीन 10, 20 आणि 50 च्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत. लहान नोटांची छपाई कमी केली जातेय. देशाला कमी-रोख अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी हे पाऊल उचललं जातंय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाव, लोगो आणि गव्हर्नर यांची सहीसुद्धा आहे...त्यामुळे अनेकांनी हा मेसेज पुढे शेअर केलाय...मेसेज प्रचंड व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...या मेसेजमध्ये आणखी एक दावा करण्यात आलाय...लोकांना रोख रकमेऐवजी UPI, कार्ड आणि नेट बँकिंग वापरण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा केलाय...याचा अर्थ लोकांना लहान मूल्यांच्या नोटा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात...हा पैशाचा विषय असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...आमच्या व्हायरल सत्य टीमने RBIकडून याबाबत माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
10, 20, 50 च्या नोटांचा तुटवडा नाही
RBI कडून तुटवड्याबाबतची कोणतीही घोषणा नाही
लहान चलनी नोटांच्या पुरवठ्यात घट झाल्याचा दावा खोटा
लोकांना असे मेसेज पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये...लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात...असे मेसेज आल्यास आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन माहिती तपासा...आमच्या पडताळणीत दिवाळीत 10, 20 आणि 50 च्या नोटांचा तुटवडा होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...