RS 1000 NOTE RETURN TO CIRCULATION saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: 1 हजाराची नोट पुन्हा चलनात येणार? 1 हजाराच्या नव्या नोटेचा फोटो जारी?

Will Rbi Bring Back Rs 1000 Currency Note: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता 1 हजार रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...नोटेचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच पुन्हा 1 हजार रुपयांची नोट चलनात येणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..

Sandeep Chavan

आता 1 हजार रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...नोट कशी आहे याचाही फोटो व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच आता ही नोट चलनात येणार आहे का...? आरबीआयने अशी घोषणा केलीय का...? ही नोट चलनात येणार असेल तर कधीपासून येणार आहे...? असे अनेक प्रश्न विचारले जातायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

नोटबंदीवेळी बंद झालेली 1 हजाराची नोट पुन्हा चलनात येणार आहे. 1 हजाराची नोट कशी दिसते त्याचाही फोटो जारी करण्यात आलाय.

ही 1 हजार रुपयांची नोट नीट पाहा...पुन्हा एकदा 1 हजार रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय... नोटेचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय. ही नोट हिरव्या रंगात दिसतेय. आधीच्या हजार रुपयांच्या नोटेचा रंग वेगळा होता. आणि आता ही नव्या रंगात नोट येणार असल्याचा दावा केल्याने सर्वांनाच याची उत्सुकता आहे...पण, खरंच ही नोट आता चलनात येणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...1 हजाराची नोट चलनात आली तर ही सर्वात मोठं चलन ठरेल...याआधी 2 हजाराची नोट चलनात होती...मात्र, ती बंद करण्यात आली...आता बंद केलेली हजाराची नोट येणार आहे का...? याबाबत आमच्या व्हायरल सत्य टीमने आरबीआयच्या साईटवर जाऊन माहिती तपासली...असं कुठेही नोटिफिकेशन आढळून आलेलं नाही...मग ही नोट कुठून आली...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

1 हजार रुपयांची नोट चलनात येणार नाही

RBI ने 1 हजाराच्या नोटेबाबत घोषणा केलेली नाही

सोशल मीडियावरील व्हायरल फोटो खोटा

दिशाभूल करण्यासाठी एडिटेड फोटो व्हायरल

अशा खोट्या नोटांचे फोटो व्हायरल करून दिशाभूल केली जाते...मात्र, हजाराची नवी नोट येणार अशी अधिकृत घोषणा आरबीआयने केलेली नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता हजाराची नोट परत चलनात येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरपूर पाणी प्यायल्यानंतरही होतो 'किडनी स्टोन'? नवीन संशोधनाचा धक्कादायक खुलासा

2029 पर्यंत महायुती टिकणार का? विधानपरिषदेत हार, महायुतीत एकमेकांवर वार

Maharashtra Weather Update : पुणे-नाशिकला पावसाने झोडपलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी; शनिवारी पावसाची काय स्थिती?

Walking Tips for Weight Loss: आठवडाभरात 1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

संजय गायकवाडांच्या मुसक्या शिंदे कधी आवळणार? वाचाळवीर आमदार भानावर कधी येणार?

SCROLL FOR NEXT