Ravana Eat Gutka Saam TV
व्हायरल न्यूज

Ravana Eat Gutka: बोलो जुबां केसरी! दहन होण्याआधी रावणाने खाल्ला गुटखा; गमतीदार VIDEO पाहून लोटपोट हसाल

Ravana Eat Gutka Video Viral: सोशल मीडियावर कालच्या दसऱ्याचे आणि रावण दहनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत.

Ruchika Jadhav

Video Viral:

धुम्रपान करणे आरोग्यासाठी घातक असते. मात्र तरीही अनेकजण सर्रासपणे धुम्रपान करतात आणि आपलं आयुष्य धोक्यात टाकतात. काल सर्वत्र रावण दहन आणि दसरा उस्ताहात साजरा झाला. सोशल मीडियावर कालच्या दसऱ्याचे आणि रावण दहनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. मात्र रावण दहनाच्या एका अतरंगी व्हिडीओने नेटकऱ्यांना खळखळून हसवलंय.

रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी परिसरातील सर्व नागरिक एकत्र येतात आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. यावेळी काही तरुण राम आणि रावणाची वेशभूषा देखील करतात. कार्यक्रमात लहान मुलांसह सर्वांचेच लक्ष या वेशभूषा केलेल्या राम आणि रावणाकडे असते. अशात रावणाची भूमिका घेतलेल्या व्यक्तीने भर कार्यक्रमात गुटखा खाल्लाय.

गुटखा खातानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. कार्यक्रमातला महत्वाचा भाग असलेल्या या रावणाकडे सारेच पाहत होते. त्यातील एका तरुणाने रावणाचा प्रताप आपल्या फोनमध्ये कैद केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक हस्यास्पद कमेंट केल्यात.

दसऱ्याला रावण दहन करून आपल्या आयुष्यातील दु:ख वाईट प्रवृत्ती आणि अन्य सर्व नकारात्मक गोष्टींचे दहन केले जाते. अशात या व्यक्तीने रावणाची वेशभूषा केली असली तरी त्याने केलेल्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी यावर संतापही व्यक्त केलाय. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी पाठलेत.

धुम्रपान हाणीकारक असूनही रावणाने गुटखा खाल्लाय. मरण्याआधी मी गुटखा तरी खाऊन घेतो, असा काहीसा विचार रावणाने केला असावा, असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT