Ratnagiri Khed taluka youth swept away Saam TV
व्हायरल न्यूज

Shocking Video : खेडमध्ये मित्रांच्या डोळ्यांदेखत 32 वर्षीय तरुण वाहून गेला; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Khed taluka youth swept away : खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

अमोल कलये, साम टीव्ही

रत्नागिरी जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. नारंगी आणि जगबुडी नदीला मोठा पूर आल्याने खेड शहरात पाणी शिरलंय. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सध्या प्रशासनाकडून पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय. अशातच खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

जेव्हा हा तरुण वाहून जात होता. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही. ही थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झाली आहे. पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचं धाडस करू नका, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय.

प्राप्त माहितीनुसार, जयेश रामचंद्र आंब्रे (वय 32) असं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या बचावपथकाचे जवान जयेश याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, खेड तालुक्यात (Ratnagiri Rain News) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे भयावह पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे.

अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचे मार्ग ठप्प जाले आहेत. खेड शिवतर मार्गावर शिवतर ते नामदेव वाडी यादरम्यान मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या खेळविणेरे मार्गावर देखील मातीचा भराव आल्याने हा मार्ग देखील बंद करण्यात आलाय. सध्या सर्वच ठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य राबवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

सरसकट कर्जमाफी द्या, पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी|VIDEO

Delhi Tourism : दिल्लीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांचे आकर्षण, सुट्टीत येथे ट्रिप प्लान कराच

Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

iPhone 15 Offer: मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर! आयफोन १५ वर मिळत आहे २०,००० रुपयांची सूट, लगेच ऑर्डर करा

SCROLL FOR NEXT