Rapido rider keeps bag to ensure woman passenger safety saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रॅपिडो रायडरच्या कृत्यानं मन जिंकलं, तरुणीचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

Rapido rider keeps bag to ensure woman passenger safety: सोशल मीडियावर रॅपिडो रायडरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या पाठीवर बॅग ठेवून अंतर ठेवण्याची युक्ती वापरताना दिसतो.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये एका रॅपिडो रायडरने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत घेतलेली छोटी चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडिओमध्ये रायडर महिला प्रवाशाला बाइकवर बसवताना आपल्या पाठीवर एक बॅग ठेवताना दिसतो. या बॅगमुळे त्याच्यात आणि महिला प्रवाशामध्ये थोडं अंतर राहील आणि प्रवास करताना महिलेला स्पर्श होणार नाही, हा त्यामागचं उद्देश आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रॅपिडोच्या बाईकवर एक मुलगी बसली आहे. ही मुलगी रॅपिडो रायडरला विचारते की, तुझ्या पाठीवर ही बॅग का आहे. यावेळी तो रायडर सांगतो की, जर मी ब्रेक मारला तर मागे बसलेल्या महिलेला माझा स्पर्श होऊ नये म्हणून ही बॅग मी पाठीवर ठेवतो.

या व्हिडिओला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय. अनेक युजर्सनी या रायडरच्या कृतीला विचारपूर्वक उचललेलं पाऊल असं म्हटलंय. एका युजरने कमेंट करताना लिहिलंय, 'अशा छोट्या गोष्टीतूनही महिलांबद्दलचा आदर दिसून येतो.' तर दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिलीये की, 'प्रत्येक रायडरने अशीच काळजी घेतली तर महिलांना प्रवास करताना अधिक सुरक्षित वाटेल.'

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर त्याची तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो. विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता दाखवणाऱ्या या कृतीकडे अनेकजण सकारात्मक पाऊल म्हणून पाहतायत.

महिलांच्या सुरक्षेबद्दल कायम प्रश्न उपस्थित होत असतो. आजच्या काळात लहान मुलींपासून वृद्ध महिलेपर्यंत अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. अशात रॅपिडो रायडरच्या युक्तीचं सर्वत्र कौतुक होतंय. सध्या सर्वत्र रॅपिडो रायडरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीच्या वसमत रोडवर धावत्या ऑटोला आग, काही क्षणात वाहन जळून खाक

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT