Railway Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Railway Stunt Video: तरुणाचा जीवघेणा स्टंट; लोकलच्या दरवाजात लटकला, रेल्वे स्टेशनच्या टोकापर्यंत पाय घसरत गेला; VIDEO

A Boy Perform Stunt On Railway Station: मुंबई लोकलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण रेल्वेला लटकून प्रवाास करताना दिसत आहे. तो लोकलच्या दरवाजात लटकून रेल्वे स्टेशन संपेपर्यंत पाय घसरत गेला. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ लग्नाचे, जुगाड केल्याचे असतात.सध्या पावसाळ्यात ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांची चढण्याची घाई, रेल्वेतील स्टंटचे अशा अनेक व्हिडिओंचा यात समावेश असतो. असाच एक रेल्वेतील स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण चक्क धावत्या ट्रेनमध्ये लटकून पाय प्लॅटफॉर्मवर ठेवून प्रवास करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ शिवडी रेल्वे स्थानकावरील आहे. या स्थानकावर एक तरुण धावत्या ट्रेनच्या खांबाला लटकून प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून घसरुन प्रवास करताना दिसत आहे. त्यानंतर तो काही वेळाने हा तरुण जशी ट्रेन पुढे जाते तसा तो व्यक्ती ट्रेनमध्ये चढतो. हा स्टंट एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतो. या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हार्बर लाइनवरील शिवडी स्टेशनवर ही घटना घडली आहे. रेल्वेतून प्रवास करताना असा स्टंट करणे खूप भयंकर ठरु शकते. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओच्या आधारे स्टंट करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याची आणि अटक करण्याचे प्रयत्न पोलिस करत आहे. या स्टंटबाजीमुळे इतर प्रवाशांनेदेखील त्रास होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा धोकादायक कृतींमुळे प्राणघातक अपघात होऊ शकतात. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. रेल्वे पोलिस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत. या तरुणावर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT