Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune: नो पार्किंगमधून दुचाकी उचलली, तरुण संतापला, रस्त्यावरच पोलिसांच्या गाडीसमोर झोपला

Pimpri-Chinchwad Viral News: सोशल मीडियावर सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील एक घटना व्हायरल होत आहे. जिथे वाहतुक- पोलिस आणि सामान्य व्यक्तीमधील वाद दाखवला आहे. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Drunk Man Incident: आळंदी येथील देहू फाटा रोडवर गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे वाहतूक विभागाचे पोलिस नो पार्किंग वाहनांवर कारवाई करत होते. त्या दरम्यान पोलिसांनी एका मद्यपी तरुणाची नो पार्किंग मधील दुचाकी वाहन उचललं. त्यावर संतापलेला तरुणाने आपलं वाहन सोडविण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांच्या वाहनासमोरच भर रस्त्यात आडवा झोपला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, व्यक्ती वाहतूक पोलिसांच्या वाहनासमोरच पहिल्यांदा उभा असलेला दिसून येईल. रस्त्याच्या मधोमध वाहन थांबवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचीही निर्माण होण्यास सुरुवात झालेली दिसते. त्यानंतर हा वाद इतका वाढतो की, तो व्यक्ती सरळ त्या वाहनाच्या समोरच झोपून जातो. सर्व प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकाने मोबाईमध्ये कैद केला आहे.

सर्व घटनेचा व्हिडिओ रातोरात सर्व समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून तो इन्स्टाग्राम, फेसबूक आणि एक्स या अकाउंटवर लोकांनी अपलोड केला आहे. सोशल मीडियावर हाच नाही तर अशा प्रकारच्या वादाविदीचे, हाणामारी तर गुन्हेगारीच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होतात. पण हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडिओ(Video) पाहताच नेटकरी वर्गातून असंख्य लाईक्स आणि लाईक्स याला मिळाले. त्यासोबतच अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले,''दररोज हेच सुरु असत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''यावर न बोलेल बर आहे'' तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: पिंपरी-चिंचवडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT