Tathawade youth stunt video Saam Tv News
व्हायरल न्यूज

Pune Stunt Video : एका पायावर उभा राहून स्कूटी दामटावली, सीटवर मांडी घालून बसला, पुण्यातील तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO

Pune Tathawade Stunt Viral Video : पुण्यातील ताथवडे परिसरात परप्रांतिय तरुण धावत्या दुचाकीवर जीवघेण स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याला कायद्याची कुठलीही भिती नसल्याचं त्याच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील ताथवडे परिसरात परप्रांतिय तरुण धावत्या दुचाकीवर जीवघेण स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याला कायद्याची कुठलीही भिती नसल्याचं त्याच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. तो तरुण मध्यप्रदेशातील असल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान, त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्याने त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर देखील तो बिनधास्तपणे दुचाकीवर स्टंट करत होता. त्याचा दुचाकीचा नंबर MP05ZD9681 हा आहे. हायवेवरून जात असताना या सर्व करामती तो करत होता. जर मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या तरुणावर वाकड पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपघातानंतरही तरुणीची आरेरावी

दरम्यान, नागपूरच्या महाल परिसरात एका तरुणीनं विरुद्ध दिशेनं कार चालवली आणि वळणावर तिच्या कारला एक दुचाकीस्वार जोरात धडकला. या अपघातानंतर रस्त्यावरच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना दिनांक ३ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मात्र. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला. तरुणीने मात्र कारमधून उतरत त्या तरुणाची हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. काही क्षणात बघा यांची एक गर्दी झाली. तरुणाची चूक नसताना या तरुणीने मात्र त्याच्यासोबत चांगलाच वाद घातला.

यामुळे अगोदरच गजबजल्याचे असलेल्या भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली आणि लोकांची गर्दी झाली याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याचा निर्णय पोलीस कर्मचारीशी सुद्धा हुज्जत घातल्याचा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT