Pune Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune: खेळण्यासाठी घराबाहेर पडला अन् कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Shirur Dog Attack: सध्या पुणे जिल्ह्यातील शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे घराबाहेर पडलेल्या एका चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे. सध्या हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Cctv Viral Video: शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलगा रस्त्यावर शांतपणे खेळत असतानाच अचानक कुत्रा धावत येतो आणि त्याच्यावर तुटून पडतो. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरुर(Shirur) शहरातील गुजरमळा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहा वर्षाच्या मुलासह सतरा जणांना चावा घेतल्याने परिसरात घबराट पसरली असून, शिरूरचे मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक महिला आणि नागरिकांनी केली आहे.

दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी खेळत असलेल्या सहा वर्षीय ईशांत राजेंद्र दारोळे याच्यावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतला. त्याला जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या परिसरात दोन कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून आत्तापर्यंत १७ पेक्षा अधिक लहान मुले (Children) आणि ज्येष्ठ नागरिक यांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT