Pune News Saam Tv
व्हायरल न्यूज

Pune News: तरुणानं टोकाचा निर्णय घेतला, गळफास लावला; तेवढ्यात घरी पोलिस पोहचले, अन्...

Pune Viral Video: जीवन संपवण्यासाठी एका तरुणाने आपल्या घरातील पंख्याला गळफास घेतला होता. पण पोलिसांमुळे या तरुणाचे प्राण वाचले. पुण्याच्या हडपसर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पुण्यामध्ये एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलंत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने राहत्या घरातच गळफास घेतला. पण तेवढ्यात त्याच्या घरामध्ये पोलिस आले. पोलिसांमुळे या तरुणाला जीवनदान मिळाले. पोलिसांनी तात्काळ गळफास घेतलेल्या तरुणाला खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जीवन संपवण्यासाठी एका तरुणाने आपल्या घरातील पंख्याला गळफास घेतला होता. मात्र वेळेवर घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांनी या तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांना हाणामारी सुरू असल्याचा कॉल आला होता. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. त्यावेळी त्यांना एक तरुण घरामध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांच्या टीमने तात्काळ या तरुणाच्या गळ्याभोवतालचा दोर कापला आणि त्याला खाल उतरवले.

पोलिसांनी बेशुद्धावस्थेत तरुणाला खांद्यावर घेऊन घराबाहेर काढले. त्यानंतर कारमधून नेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तरुणाचे प्राण वाचवल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील सात दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह 'या' राज्यात धुवाँधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधु एकत्र आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे - मंत्री जयकुमार गोरे

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

SCROLL FOR NEXT