Principal Facial Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Principal Facial Video: शाळेचं ब्युटी पार्लर बनवलं, VIDEO काढला म्हणून शिक्षिकेला चावली; मुख्यध्यापिकेचा संतापजनक प्रताप व्हायरल

Viral Video News: एक मुख्यधापिका शाळेमध्ये फेशिअल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. शाळेतील सहाय्यक शिक्षिकेने हा व्हिडिओ तिच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

Rohini Gudaghe

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शाळेतील असल्याचं सांगितलं (Principal Facial Video) जात आहे. एक मुख्यधापिका शाळेमध्ये फेशिअल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. शाळेतील सहाय्यक शिक्षिकेने हा व्हिडिओ तिच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका फेशियल करण्यात व्यस्त होत्या. त्यानंतर सहाय्यक शिक्षिका मोबाईल कॅमेरा चालू करून आत त्या रूममध्ये शिरल्या. यादरम्यान त्यांनी (Principal Facial During School Time Video) ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. त्यामुळे संतापलेल्या मुख्यध्यापिकेने या शिक्षिकेवर हल्ला केला. ती शिक्षिकेच्या हाताला चावल्याचं दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, शाळेचं रूपांतर ब्युटी पार्लरमध्ये झालं आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत (viral) फेशियल करत होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं आहे. या व्हिडिओमुळे वातावरण तापले आहे. नेटकरी या मुख्यध्यापिकेवर संताप व्यक्त करत आहे.

व्हिडिओ काढल्यामुळे संतापलेल्या मुख्यध्यापिकेने या शिक्षिकेचा पाठलाग केली. तिला मारहाण केल्याचं आणि तिच्या हाताला चावल्याचंही दिसत आहे. व्हिडिओमध्ये (viral video) शिक्षिकेच्या हातावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. त्याच्या एका हातावर चाव्यल्याच्या स्पष्ट खुणा होत आहेत, तर दुसऱ्या हातातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे.

न्युज १८ च्या वृत्तानुसार, सहाय्यक शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीच्या आधारे, बिघापूर पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले (viral news) आहेत. याबाबत बोलताना बिघापूर मंडळ अधिकारी माया राय यांनी शाळेच्या सहाय्यक शिक्षिकेने शाळेच्या वेळेत फेशियल केल्याची आणि पकडल्यास मारहाण केल्याची तक्रार शाळेच्या सहाय्यक शिक्षिकेकडून मिळाल्याला दुजोरा दिला. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं संबंधित अधिकारी म्हणाले आहेत. शाळेमध्ये असे भयानक प्रकार घडत असल्यामुळे पालकांच्या मनामध्ये भिती निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT