Viral Cctv Footage Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Cctv Footage : संकटात खाकी वर्दीतील 'देव' मदतीला धावला; धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेसह बाळाचे वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Viral video : सोशल मीडियावर कायम अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवास करताना कायम सावध राहून प्रवास करावा लागतो. कारण लोकल ट्रेन असो वा किंवा पॅसेंजर ट्रेन असो गाडीतून चढताना किंवा उतरताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातात मात्र तरीही नागरिक घाई करण्याच्या नादात ट्रेनमधून पडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.ज्यात धावत्या रेल्वेत चढत असतांना दोन महिलांसह चार वर्षाच्या बाळाला पोलिसांनी वाचवले आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत असून पोलिसांचे कौतूक केले जात आहे.

संपूर्ण हा प्रकार नाशिकच्या (Nashik)रेल्वे स्थानकात घडला असल्याचे समजते. धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडले. पंरतू तेथे असलेल्या एका सतर्क पोलिसाने दोन महिलांसह चार वर्षाच्या बाळाला बाचवले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर येत आहे.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन (Train)प्लॅटफॉर्मवर होती आणि काही वेळात ट्रेन निघते. मात्र त्याच दरम्यान ट्रेन बाहेर असलेली महिला धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतेय. या महिलेच्या हाताता आपल्याला एक लहान मुलं ही दिसून येत आहे. जशी ती महिला ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असते तशी तिचा तोल जाऊन ती आणि तिच्या सोबत लहान बाळ तसेच अजून एक महिला जारोत धावत्या ट्रेनमधून पडते. पंरतू तेथे असलेल्या सतर्क पोलिसांच्या प्रसंगावधानाने तिंघही वाचतात. शिवाय इतर प्रवाशीही या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळाने धावणारी ट्रेन थांबवली जाते.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर याआधीही धावत्या ट्रेनमधून पडताना अनेक व्यक्तींचा जीव गेला आहे आणि त्याचे व्हिडिओ(Video) व्हायरलही झाले आहेत. परंतू सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @saamtvnews या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' त्या पोलिसांचे करावे तेवढे कौतूक कमी.' तर काही यूजरने महिलांवर संताप व्यक्त केलाय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

Kharghar Tourism : वीकेंडला थेट पनवेल गाडी पकडा अन् 'खारघर' ला पोहचा, पाहा 'ही' निसर्गरम्य ५ पर्यटन स्थळे

Weight Loss Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Crime news: पत्नीचं दुसरीकडे अफेअर, पतीची दिली सुपारी; नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजून प्रियकराला केले १०० पेक्षा जास्त फोन आणि...!

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT